विशेष

Indapur Dr. Suicide / इंदापूरमधील नामांकित त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अवधूत खबाले यांची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट.

इंदापूर,दि १७

  • इंदापूर शहरातील नामांकित त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अवधूत खबाले यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेमुळे इंदापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. अवधूत खबाले हे त्वचारोग तज्ज्ञ म्हणून इंदापूर शहरात परिचित होते. त्यांनी नुकतेच इंदापूर शहरात त्वचारोग उपचारासाठी स्वतःचे हॉस्पिटल सुरू केले होते. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

डॉ. खबाले यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील मौजे शहा असून, ते अनेक वर्षांपासून इंदापूर शहरात स्थायिक झाले होते.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

डॉ. अवधूत खबाले यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने वैद्यकीय क्षेत्रासह इंदापूर शहर आणि शहा परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!