क्राईम

Indapur breaking news/कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट; राहुल खुरंगे यांच्याविरोधात इंदापूरमध्ये गुन्हा दाखल‌.

नगरसेवक पोपट शिंदे यांनी केला गुन्हा दाखल.

इंदापूर दि २६

  • राज्याचे कृषिमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी राहुल खुरंगे (रा. लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक पोपट शिंदे यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.

राहुल खुरंगे यांनी त्यांच्या वैयक्तिक फेसबुक खात्यावरून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वैयक्तिक जीवनासंदर्भात वादग्रस्त विधान करणारी पोस्ट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या पोस्टमुळे वाद निर्माण झाल्यानंतर पोपट शिंदे यांनी पोलिसांत धाव घेतली.

यापूर्वीही संबंधित व्यक्तीने दत्तात्रय भरणे यांच्याबाबत अशाच प्रकारची पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे तक्रारदार पोपट शिंदे यांनी सांगितले. वारंवार अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जात असल्याचा आरोप करत, यावेळी संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

पोपट शिंदे हे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!