कृषी

INDAPUR karmyogi/जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर अन् दर ८ दिवसांनी खात्यात पैसे! कर्मयोगीचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; बाबुराव बोत्रे पाटलांची घोषणा!

इंदापूर,दि ७

  • कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि ओंकार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील उपस्थित होते.

यावेळी बोलताना ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. यंदाच्या गळीत हंगामात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पेमेंट प्रत्येक आठ दिवसांनी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा आणि उसाचे पैसे वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी दर आठ दिवसांनी पेमेंट जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना चांगला ऊसदर आणि वेळेत पेमेंट देण्याची ग्वाही देत सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना (ओंकार शुगर) यांना आपला ऊस देऊन सहकार्य करावे, असे आवाहन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!