Good news Indapurkar! Starting monjinis/इंदापूर मधील खवय्यांसाठी आनंदाची बातमी! मॉन्जिनिसची शॉपी सुरू; आता जागतिक दर्जाच्या केकचा आस्वाद शहरातच!

इंदापूर,दि २३
- केक आणि बेकरी पदार्थांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील प्रसिद्ध बेकरी ब्रँड मॉन्जिनिस (Monginis) या ब्रँडची शॉपी आता इंदापूर शहरात सुरू झाली आहे. त्यामुळे इंदापूर शहरासह परिसरातील खवय्यांना विविध प्रकारचे केक आणि बेकरी पदार्थ चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
इंदापूर येथील जुनी मार्केट कमिटी, शॉप क्रमांक ३९, साई मॉलसमोर मॉन्जिनिसची ही शॉपी सुरू करण्यात आली आहे. वाढदिवस, लग्नसमारंभ, वर्धापनदिन तसेच विविध कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी केक खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आता शहरातच आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.
इंदापूर शहरातील ग्राहकांना नामांकित मॉन्जिनिस ब्रँडचे दर्जेदार केक आणि बेकरी पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आम्ही राऊत बंधूंनी एकत्र येऊन या शॉपीची सुरुवात केली आहे. इंदापूरकरांचा विश्वास आणि प्रेम मिळवून ग्राहकांना चांगली सेवा देणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
प्रमोद राऊत, (इंदापूर)
मॉन्जिनिस या प्रसिद्ध ब्रँडच्या माध्यमातून ग्राहकांना विविध प्रकारचे केक, पेस्ट्री आणि इतर बेकरी पदार्थ उपलब्ध होणार आहेत. यामुळे केक खरेदीसाठी इतर शहरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.
इंदापूर शहराचा वाढता विस्तार आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेता, नामांकित ब्रँडची शॉपी सुरू होणे ही स्थानिक ग्राहकांसाठी महत्त्वाची बाब आहे. प्रसिद्ध ब्रँडच्या केकचा आस्वाद आता इंदापूरमध्येच घेता येणार असल्याने खवय्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मॉन्जिनिस शॉपी, जुनी मार्केट कमिटी, शॉप क्रमांक ३९, साई मॉलसमोर, इंदापूर. (98230 04030)



