Harnavl Guruji/पुणे पदवीधर निवडणुकीत हरणावळ गुरुजींचे आव्हान; प्रस्थापितांमध्ये अपक्षाची दमदार एंट्री!

इंदापूर,दि १७
- पुणे पदवीधर मतदारसंघातून इंदापूर तालुक्यातील गोखळी येथील लक्ष्मण हरणावळ गुरुजी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या हरणावळ गुरुजी यांनी आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
गोखळी येथे शिक्षण संस्था चालवणाऱ्या हरणावळ गुरुजी यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असून, पदवीधरांच्या विविध प्रश्नांसाठी ते सातत्याने लढत आले आहेत. तरुण व तळमळीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचे पाठबळ नसतानाही ते केवळ आपल्या सेवाभावी कार्याच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात एका बाजूला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार, तर दुसऱ्या बाजूला महायुतीचे उमेदवार अशी लढत होत असताना लक्ष्मण हरणावळ गुरुजी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे. पक्षीय ताकद आणि राजकीय पाठबळाच्या जोरावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार लक्ष्मण हरणावळ गुरुजी यांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडली आहे.
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांमध्ये हरणावळ गुरुजी यांचे समर्थक आणि चाहते असल्याचे सांगितले जात आहे. पदवीधर मतदारांशी असलेला संपर्क, शैक्षणिक क्षेत्रातील काम आणि पदवीधरांच्या प्रश्नांसाठी केलेले प्रयत्न ही त्यांची प्रमुख ताकद मानली जात आहे.
एकीकडे प्रस्थापित राजकीय पक्षांचे उमेदवार, तर दुसरीकडे कोणत्याही पक्षाचे मोठे पाठबळ नसलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण हरणावळ गुरुजी, अशी या निवडणुकीची चर्चा रंगत आहे. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील ही निवडणूक ‘धनशक्ती विरुद्ध जनशक्ती’ अशी ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हरणावळ गुरुजी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे या निवडणुकीतील चुरस वाढली आहे.



