विशेष

INDAPUR Nira-Bhima/ नीरा-भीमाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार; २२ सप्टेंबरला दिल्लीत होणार सन्मान.

इंदापूर,दि.१२

  • शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने देशपातळीवर पुन्हा एकदा आपली तांत्रिक कार्यक्षमता सिद्ध केली आहे. गाळप हंगाम २०२५-२६ साठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्ली यांच्याकडून कारखान्यास राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी माहिती दिली.

कारखान्याने २०२५-२६च्या गळीत हंगामात विविध तांत्रिक पॅरामीटर्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच वर्षी कारखान्याचा रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम पार पडला. रौप्यमहोत्सवी वर्षातच देशपातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने नीरा-भीमा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी व वाहतूकदार, अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतकांचे अभिनंदन केले.

मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार असून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यास आतापर्यंत राज्य व देशपातळीवरील एकूण १३ पुरस्कार मिळाले असल्याची माहितीही अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!