Uncategorized

इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी संदीप पाटील; उपसभापतीपदी रुपालीताई वाबळे बिनविरोध.

इंदापूर,दि १०

  • इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्री. संदीप चित्तरंजन पाटील तर उपसभापतीपदी सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी पार पडली.बाजार समितीचे मार्गदर्शक व पीडीसीसी संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी सभापती व उपसभापती पदासाठी सूचना मांडली, तर संचालक दत्तात्रय फडतरे यांनी त्यास अनुमोदन दिले.

यावेळी मावळते सभापती तुषार जाधव व उपसभापती मनोहर ढुके यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीने शेतकरीभिमुख अनेक आधुनिक सुविधा उभारून बाजार समितीचा नावलौकिक वाढविला. तसेच बाजार समितीची उलाढाल ३८५ कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, सहकार क्षेत्रातील अनुभव असलेले व शेतकऱ्यांशी जवळची नाळ असलेले युवा नेतृत्व म्हणून संदीप चित्तरंजन पाटील यांची सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. तसेच शेटफळगढे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा तसेच सहकार क्षेत्रातील अनुभव असलेल्या सौ. रुपालीताई संतोष वाबळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अमोल भोईटे तर व्हाईस चेअरमनपदी विष्णुपंत देवकाते यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक बी. के. शिवरकर यांनी तर सहाय्यक अधिकारी म्हणून गोलांडे मॅडम यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!