INDAPUR agriculture minister/कृषिमंत्र्यांच्या व्हिडिओवरील कमेंटवरून शिवीगाळ व धमकीचा आरोप; इंदापूर पोलिसांत तक्रार.

इंदापूर,दि १६
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुका प्रवक्ते संदेश प्रतापराव देवकर यांनी सोशल मीडियावरील कमेंटवरून राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप करत इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २९ जुलै २०२६ रोजी सकाळी फेसबुकवर महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सभेचा एक व्हिडिओ पाहत असताना त्याखालील कमेंटमध्ये राहुल खुरंगे, रा. लाखेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे यांचे नाव दिसून आले. संबंधित कमेंटमध्ये कृषिमंत्र्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे तसेच धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराबाबत पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संबंधित राहुल खुरंगे यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार देण्यासाठी इंदापूर पोलीस ठाण्यात आलो असल्याचे संदेश देवकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
देवकर हे मागील पाच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुका प्रवक्त्याची भूमिका बजावत असून पक्षाची भूमिका प्रिंट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.



