इंदापूरात आरशादभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न.
नगराध्यक्ष भरत(शेठ)शहा यांची प्रमुख उपस्थिती.

इंदापूर,दि ११
- पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरात सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारा भव्य रोजा इफ्तार कार्यक्रम उत्साहात पार पडला. मंगळवार दि. १० मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमास इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत(शेठ)शहा यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
आरशादभाई सय्यद मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इफ्तारच्या वेळी सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे रोजा सोडत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडवले.
तसेच विशेष मान्यवर म्हणून माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, नगरसेवक पोपट शिंदे, युवा नेते प्रमोद राऊत, प्रा अशोक मखरे, आरपीआयचे नेते शिवाजीराव मखरे, राष्ट्रवादीचे नेते संदीपान कडवळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, नगरसेवक अनिल ढावरे, गटनेते शकीलभाई सय्यद यांच्यासह समाजातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रमजान हा संयम, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र महिना आहे. अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ होतो.
मा.भरत (शेठ) शहा.(नगराध्यक्ष-इंदापूर नगरपालिका)
कार्यक्रमाचे आयोजक आरशादभाई सय्यद यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमामुळे परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



