विशेष

इंदापूरमध्ये अहमद रजा सोशल फाउंडेशनतर्फे रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न.

इंदापूर,दि ९

  • पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर येथील अहमद रजा सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली रोजा इफ्तार पार्टी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. शुक्रवार दि. ६ मार्च २०२६ रोजी मगरिबच्या नमाजनंतर शेख मोहल्ला, इंदापूर येथे हा कार्यक्रम पार पडला.

या इफ्तार पार्टीस परिसरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. रमजान महिन्यातील रोजा सोडण्यासाठी सर्वांनी एकत्र येत बंधुभाव, एकता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. उपस्थितांनी एकत्रितपणे इफ्तार करत रमजानच्या पवित्र महिन्याचे महत्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आयोजन अहमद रजा सोशल फाउंडेशन, इंदापूर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमामुळे परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!