महाराष्ट्र

द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी वायनरी सहकारी संस्थेची भूमिका महत्त्वाची – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

इंदापूर,दि ११

  • इंदापूर तालुक्यातील द्राक्ष प्रक्रिया व वायनरी सहकारी संस्था मर्यादित, बिरंगुडवाडी कळस येथे यंदाच्या द्राक्ष गाळप हंगामाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित राहून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला सह्याद्री व्हाईन्स प्रा. लि. चे अध्यक्ष हेमावंत नामदारियन यांचीही प्रमुख उपस्थिती होती. युवा नेते राजवर्धन पाटील यांच्यासह इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन होत असून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने द्राक्ष प्रक्रिया व वायनरी निर्मितीसाठी सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

सन २००४ मध्ये सुरू झालेली ही संस्था आज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला अधिक मूल्य मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. या संस्थेमुळे शेतकऱ्यांना द्राक्ष प्रक्रिया करून बाजारपेठ उपलब्ध होत असून आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होत आहे.

या वायनरी संस्थेची क्षमता सुमारे ३ लाख ६१ हजार बल्क लिटर असून दररोज सुमारे २० टन द्राक्ष क्रशिंग क्षमता या प्रकल्पात आहे. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होत आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत असून त्यांच्या हितासाठी अशा प्रक्रिया उद्योगांना अधिक चालना देणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात द्राक्ष उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

या वायनरी प्रकल्पामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षाला चांगला बाजारभाव मिळून त्यांना आर्थिक लाभ होत असून भविष्यात या उद्योगामध्ये आणखी वाढ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!