अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर इंदापूर मध्ये हापूस आंब्याला मागणी वाढली-शशिकांत निकम.( आंबा व्यापारी)

इंदापूर,दि.२८
- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर इंदापूर मध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याला मागणी वाढली असून आंब्याचे दरही स्थिर असल्याने खवय्यांना व ग्राहकांना यंदा उच्च प्रतीचा व कोकणातील रत्नागिरी देवगडचा हापूस आंबा इंदापूर शहरात योग्य दरामध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती इंदापूर पंचायत समिती गेटवरील फळ व्यापारी शशिकांत निकम यांनी दिली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या आंबा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात इंदापूर शहरातील बाजारपेठेमध्ये फळांचा राजा कोकणातील रत्नागिरी व देवगडचा हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. आंबा खवय्येनांही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर चव चाखायला मिळणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे शशिकांत निकम यांनी सांगितले.
मात्र, काही लोकांनी स्थानिक बाजार पेठेमध्ये कर्नाटकी आंबा आणला असून तोच कोकणातील हापूस म्हणून विक्री करत ग्राहकांची फसवणूक करताना दिसत आहेत. कर्नाटकातून येणाऱ्या आंबा पेटीवर रत्नागिरी हापूस असे लेबल लावून राजरोसपणे विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळे ओरिजनल हापूस आंब्यावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे .
इंदापूर शहरातील खवय्यांना कोकणातील ओरिजनल हापूस आंब्याची चव चाखायची असेल तर आपणाला इंदापूर पंचायत समितीच्या गेटवरील निकम फ्रुट स्टॉल यांच्याशी 7709914191/7083181408 या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा अशी विनंती शशिकांत निकम यांच्या वतीने करण्यात आली.



