इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे आधार सेवा केंद्र सुरू; ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा दिलासा.

इंदापूर,दि.२०
- इंदापूर तालुक्यातील निमसाखर परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण झाली असून निमसाखर येथे नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. निमसाखर येथील एन.ई.एस. हायस्कूल समोर सुरू झालेल्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये आधार कार्डसह विविध शासकीय सेवा आता ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना आधार कार्डमधील बदल, मोबाईल नंबर अपडेट, जन्मतारीख दुरुस्ती, नाव बदल तसेच विविध शासकीय दाखल्यांसाठी वारंवार इंदापूर तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते. अनेक वेळा दिवसभर रांगेत उभे राहूनही कामे होत नसल्याने नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत होता.
विशेषतः शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत होता.मात्र,आता निमसाखर येथे सुरू झालेल्या या अत्याधुनिक महा-ई-सेवा केंद्रामुळे नागरिकांचा वेळ, प्रवास आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. गावाजवळच सर्व सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आधार कार्ड संबंधित सर्व कामे, विविध प्रकारचे दाखले, ऑनलाईन अर्ज, शासकीय योजना तसेच इतर महत्त्वाच्या सेवा आता तत्काळ उपलब्ध होणार आहेत.
निमसाखर येथील आधार सुविधा केंद्रामुळे निमसाखरसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना मोठा फायदा होणार असून विद्यार्थ्यांसाठीही ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शाळा, महाविद्यालय प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय कामांसाठी लागणारे दाखले आता सहज उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
ग्रामीण भागात डिजिटल सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचे पाऊल मानले जात असून “आता गावातच सर्व सुविधा” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली सुविधा अखेर सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
निमसाखर येथील एन.ई.एस. हायस्कूल समोर सुरू करण्यात आलेल्या या महा-ई-सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक : ७९७२६४४२४२.



