राजकीय

Bharani mama BJP/भरणे मामांच्या कार्यकर्त्यांचा ‘कमिंग सून’ स्टेटस; इंदापूर भाजपाच्या ‘मिशन भरणे’ची पुन्हा चर्चा!

इंदापूर,दि ३

  • इंदापूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चाहूल लागली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या स्टेटसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा फोटो ठेवण्यात आला असून, त्यासोबत ‘Coming Soon’, ‘अंत अस्ती प्रारंभ’ अशा आशयाचे संदेशही झळकताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ शेअर करत, “उशीर झाला की मनुष्य दोन ठिकाणी धाव घेतो… एक दवाखाना आणि दुसरे देवघर. सर्वांना असं वाटतंय की अध्याय संपला; तर अध्याय तर आता सुरू होणार…” अशा आशयाचा संदेशही काही कार्यकर्त्यांनी स्टेटसवर ठेवला आहे.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दत्तात्रय भरणे एकमेकांकडे पाहून नमस्कार करतानाचा फोटोही सोशल मीडियावर झळकत आहे. त्यामुळे भरणे समर्थकांना आता भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची जवळीक अधिक भावू लागली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

दत्तात्रय भरणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत यापूर्वीही विविध चर्चा होत आल्या आहेत. गेल्या काही काळापासून भरणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या राजकीय चर्चाही अधूनमधून रंगत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावरील या स्टेटसमुळे ‘मिशन भरणे’ पुन्हा सुरू झाले आहे का?, भरणे समर्थकांचा हा केवळ सोशल मीडिया ट्रेंड आहे की आगामी राजकीय घडामोडींचा संकेत? आणि ‘कमिंग सून’चा नेमका अर्थ काय? असे अनेक प्रश्न इंदापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत.

आगामी काळात दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, कार्यकर्त्यांच्या या स्टेटसमुळे इंदापूरच्या राजकारणात पुन्हा काही मोठी राजकीय उलथापालथ होणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • सदरचा स्टेटस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक सिने अभिनेते बाबा गायकवाड यांनी ठेवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!