क्राईम

Indapur/सातबारा उताऱ्यावरून महिला तलाठी कर्मचाऱ्याला फोनद्वारे त्रास; कालठण च्या सचिन जाधव याच्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल.

इंदापूर,दि १६

  • सातबारा उतारे कृषी अधिकाऱ्यांकडे का दिले नाहीत, अशी विचारणा करत तलाठी कर्मचाऱ्याला वारंवार फोन करून त्रास दिल्याप्रकरणी सचिन वामन जाधव (रा. कालठण-१ , ता. इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तक्रारीतील माहितीनुसार, “माझे सातबारा उतारे तुम्ही कृषी अधिकाऱ्यांकडे का दिले नाहीत? याबाबत तुमची तक्रार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करणार आहे,” असे सांगत सचिन जाधव यांनी तलाठी कर्मचाऱ्याला वारंवार फोन केले. या प्रकारामुळे नाहक त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३५१(४) व ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!