सामाजिक

निरा-भिमा कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा.

Harshvardhan Patil Indapur/रक्तदान शिबिरात १६३ बाटल्या रक्त संकलित; ५६३ केशर आंब्याच्या रोपांचे वाटप.

इंदापूर,दि २२

  • दि.२१ ऑगस्ट २०२६ शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आणि कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. २१) विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १६३ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.

कारखान्याच्या भाग्यरत्न सांस्कृतिक भवन येथे आयोजित कार्यक्रमात रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हिमोग्लोबीन, लिपीड प्रोफाईल, एक्स-रे, ईसीजी तसेच ओपीडीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ऊस उत्पादक महिला अश्विनी गणेश कदम यांनी बेंबळे (ता. माढा) येथून येऊन रक्तदान केले.

यावेळी कर्मचारी वर्ग तसेच उपस्थितांना केशर आंब्याच्या ५६३ रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कारखान्याचे कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी सांगितले की, कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील आणि संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यावेळी संचालक मंडळाच्या वतीने केक कापून हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

अभिष्टचिंतन सोहळ्यात संचालक उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी यादव यांनी मनोगत व्यक्त करून हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, अनिल बोंद्रे, रामचंद्र नाईक, शिवाजी हांगे, निवृत्ती शिंदे, दत्तात्रय पोळ, चंद्रकांत भोसले, किरण पाटील, महावीर गांधी, नानासाहेब देवकर, मोहन गुळवे, श्रीनिवास कोरटकर, के. एस. खाडे, युवराज रणमोडे, माणिक खाडे, संतोष साखरे, संतोष जगताप, रक्तपेढीचे धीरज पाटील यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले, तर आभार कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!