क्रीडादेश-विदेश

Good News/बेडशिंगच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवर निवड; कपिल मिसाळ यांच्यावर जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या समन्वयाची जबाबदारी.

इंदापूर,दि २०

  • इंदापूर तालुक्यातील बेडशिंग गावचे सुपुत्र कपिल सुभाष मिसाळ यांची पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी समन्वय समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाने दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. या जबाबदारीच्या अनुषंगाने कपिल मिसाळ यांना ३ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथील पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक नियोजन व समन्वयाचे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर नियोजन, समन्वय आणि विविध प्रशासकीय बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची जबाबदारी कपिल मिसाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

इंदापूर तालुक्यातील बेडशिंगसारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा व्यवस्थापनात महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने कपिल मिसाळ यांच्या या निवडीची तालुक्यात विशेष चर्चा होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल बेडशिंगसह इंदापूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!