विशेष

INDAPUR/इंदापूरच्या बाब्रस मळ्यात अपार्टमेंटमधील फ्लॅटला आग; आग तात्काळ अटोक्यात आणण्यात नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला यश.

नगरपालिकेच्या अग्निशमन दलाची तत्परता; १५ ते २० मिनिटांत आगीवर नियंत्रण.

इंदापूर,दि १२

  • इंदापूर शहरातील बाब्रस मळा येथील विष्णू प्रभा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटला रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० ते ७:५० च्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच इंदापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या १५ ते २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!