विशेष
इंदापूरच्या पोपट शिंदे वरती लवकरच मोठी जबाबदारी.

इंदापूर,दि.१६
- इंदापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता राहिलेले पोपट शिंदे हे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे निष्ठेचे फळ म्हणून पोपट शिंदे यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी येणार असून त्यांना इंदापूर तालुक्या सह जिल्ह्यात आणि राज्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती खात्रीला सूत्राने दिली आहे.
माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेता असलेले पोपट शिंदे यांनी अल्पावधीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटविला आहे. तसेच ते कायम सर्वसामान्य लोकांसहित सर्वांच्या मदतीला तात्काळ धावून जाणारे युवा नेते म्हणून सर्वश्रुत परिचित आहेत.
पोपट शिंदे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातील माळी समाजामध्ये पोपट शिंदे यांचे वेगळेच वलय आहे. त्यामुळे पोपट शिंदे यांना तालुका व जिल्हा सह राज्यांमध्ये काम करण्याची संधी लवकरच मिळणार असल्याचे बोलले जात आहे.



