इंदापूर मध्ये आंबेडकरवादी कार्यकर्ते व संघटनांचे धरणे आंदोलन सुरू.

इंदापूर/ प्रतिनिधी:-
- इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व संघटनांच्या वतीने प्रशासकीय भवनासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्याचे सरचिटणीस ॲड. राहुल मखरे, रिपाईचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तानाजी धोत्रे, हनुमंत कांबळे, शरद चितारे,अनिल कांबळे,सूरज धाईंजे, दत्तात्रय जगताप,ॲड.समीर मखरे, संजय कांबळे व इतर कार्यकर्त्यांनी हे श्रृंखलाबद्ध धरणे आंदोलन सुरु केले आहे.
इंदापूर मध्ये बेकायदेशीर धंद्यांना संरक्षण.अवैध वाळू व उपसा करणारे वाळू माफियांना संरक्षण.लाखो रुपयांच्या हप्त्याची वसुली.गुटखा व्यापाऱ्यांच्या माध्यमातुन लाखो रुपयांच्या बेकायदेशीर गुटख्याचा पुरवठा केला जातो.ॲड.राहुल मखरे यांचेवर खोटा गुन्हा नोंदवून त्यांना नाहक त्रास दिला.
आंदोलनकर्त्यांना दि.१६ सप्टेंबर रोजी पोलीसांनी समजपत्र दिले आहे. इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यापूर्वी अवैध मटका, जुगार, दारुबंदीचे खटले दाखल करण्यात आले आहेत. अवैध धंदे निदर्शनास आल्यास आम्हाला अवगत करावे. नावे गोपनीय ठेवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. तरी धरणे आंदोलन करु नये अशा आशयाचा मजकूर समजपत्रात लिहिण्यात आला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी ते पत्र स्वीकारले नाही. त्यावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळे ते पत्र त्यांच्या WhatsApp वरती बजावण्यात आले आहे.



