३०७ मधील फरारी आरोपीला वालचंदनगर पोलिसांकडून बेड्या.
सह पो निरीक्षक राजकुमार डुणगे यांची दमदार कामगिरी...
इंदापूर,दि १७
- वालचंदनगर पोलीस स्टेशन सध्या अवैध धंद्यावरती व गुन्हेगारांवरती होत असलेल्या धडक कारवाईने चर्चेत आले असून लोकांमध्येही पोलीस स्टेशनच्या कामकाजाबद्दल आनंदाचे वातावरण आहे. त्यातच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा.पो. निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी कारवाईचा धडाका लावत अवैध धंदेवाल्यांचे व गुन्हेगारांचे कंबरटे मोडले असून ३०७ मधील फरार असलेल्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील ३०७ सह इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी निरंजन लहू पवार हा गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस प्रशासनाला सापडत नव्हता. मात्र वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी म्हणून सह पो निरीक्षक राजकुमार डुणगे यांची नेमणूक होताच फरार आरोपी निरंजन लहू पवार यास गोपनीय माहितीच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत.
सदर आरोपीवरती वालचंदनगर व इंदापूर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर गु.रजि.नंबर ३०३/२०१९ भादवी कलम ३९५ नुसार सह मोका कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली होती. सदरचा आरोपी हा मोका कारवाई मधून जामीन मिळाल्यानंतर त्याने सदरचा गुन्हा केला होता. तेव्हापासून तो फरार आरोपी होता.
सदरची कारवाई बारामती उपविभागीय पोलीस अधीक्षक राठोड, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली, पोलीस हवालदार चौधरी,पो कॉन्स्टेबल विक्रमसिंह जाधव, अभिजीत कळसकर, चोपने, वानकर यांच्या पथकाने केली आहे.