विशेष

उजनी@१००.५९%

उजनी धरण १००.५९ % भरल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.

इंदापूर,दि १०

  • पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदायनी ठरलेले उजनी धरण शुक्रवार दि १०.ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ घ्या सुमारास १००.६७ टक्के भरले, सध्या धरणात ११७.५९ टीएमसी पाणी साठा झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे उजनी धरणात मागील दिड महिन्यांपासून अनेक वेळा दौंड मधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात आला होता, परंतु पुण्यासह मावळमध्ये होत असलेल्या सततच्या पावसामुळे व दौंड येथून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गावरच उजनी धरणाने आज १०० टक्क्याची पातळी ओलांडली आहे.

२०१९ या वर्षी उजनी २७ ऑगस्टला १०० टक्के भरले होते. तर २०२० वर्षी उजनी ६ ऑगस्ट रोजी १०० टक्के झाले होते.तर ५ ऑक्टोंबर २०२१ रोजी उजनी शंभर टक्के भरले होते. मात्र या वर्षी गेल्यावर्षी पेक्षा जवळपास दोन महिने अगोदर उजनी धरण १०० टक्के भरले आहे. उजनीची निर्मिती झाल्यापासून म्हणजे गेल्या ४५ वर्षात ३४ वेळा १०० टक्के उजनी धरण भरले गेले आहे.

उजनी धरणावरील, भीमा नदीला येऊन मिळणाऱ्या मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी या लहान-मोठ्या नद्यावर असलेल्या १९ धरणांपैकी अनेक धरणे १०० टक्के भरून ‘ओव्हरफ्लो’ झालेली आहेत.

जुलै महिन्या पासून पुणे जिल्हा, मावळ भाग व भीमाशंकरचे डोंगर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्व नद्यांन मध्ये पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती.हे वाढ झालेले पाणी दौंड येथून भीमा नदीत येत असल्यामुळे उजनी धरणातील पाण्याची पातळी सतत वाढत राहिल्यामुळे आज अखेरीस उजनी धरण १०० टक्के भरू शकले आहे.

उजनीच्या पाण्यामुळे दुष्काळी जिल्ह्याचा कायापालट होत येथील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. फळबागांचे जाळे, मोठ्या प्रमाणावरील ऊस उत्पादन,त्यावर सुरू झालेले ३३ साखर कारखाने हे सारे या उजनीच्या पाण्याच्या जीवावरती अवलंबून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!