democrat Annabhau Sathe/ माळवाडी नं.२ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी.

इंदापूर, दि २
- इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं. २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार (दि. १ ऑगस्ट २०२६) रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य यशराज अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, माळवाडीचे सरपंच बाळासाहेब व्यवहारे, नगरसेवक सुधाकर ढगे, नगरसेवक अजिंक्य जावीर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव गार्डे व बाळासाहेब मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल ढावरे, उपाध्यक्ष संदीप ढावरे, श्रीरंग नवले, गोकुळ व्यवहारे, महादेव व्यवहारे, अंगणवाडी शिक्षिका वैशाली गार्डे, रोडे मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी नं २, (गार्डे वस्ती) व ढावरे प्रतिष्ठान यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्यावर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडीच्या शिक्षिका वैशाली थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि महापुरुषांच्या विचारांचा आदर्श अंगीकारण्याचे आवाहन केले.
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाचे तसेच शिक्षकांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले.ढावरे प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच इंदापूर शहरातील श्रावण बाळ अनाथ आश्रमातील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले तसेच उपस्थितांना वृक्षांची रोपे भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक संदीप नवले व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल ढावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



