Ajitdada:-इंदापुरात अजितदादांच्या जयंतीनिमित्त ‘आरोग्य महायज्ञ’; मोफत आरोग्यसेवा उपक्रमांचे आयोजन.

इंदापूर, दि.२३
- Ajitdada;इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, इंदापूर शहर आणि श्री नारायणदास रामदास ट्रस्ट, इंदापूर यांच्या वतीने स्वर्गीय मा. श्री. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध मोफत आरोग्यसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘आरोग्य महायज्ञ’ या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहा सांस्कृतिक भवन, इंदापूर येथे हे शिबिर होणार आहे.
या उपक्रमात मोफत गुडघा व खुबा सांधेरोपण शस्त्रक्रिया अभियान, तसेच गुडघा सांधे प्रत्यरोपण, खुबा सांधे प्रत्यरोपण, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची लिगामेंट शस्त्रक्रिया आणि विविध प्रकारच्या फ्रॅक्चर शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.
याशिवाय नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. तसेच मोफत रेशनकार्ड अर्ज व दुरुस्ती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
या सर्व उपक्रमांचे निमंत्रक म्हणून इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मोफत आरोग्यसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
संपर्क : ९७६७८७८२८२ / ९९७५०६३६४३



