विशेष

इंदापूर मधील ‘मटका चालक’ सोमनाथ शिंदे वर गुन्हा दाखल.

भाजीमंडई परिसरातील मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एजंटसह रोख रक्कम व साहित्य जप्त.

इंदापूर,दि २१

  • इंदापूर शहरातील नगरपालिका परिसरातील भाजीमंडईजवळ सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत इंदापूरच्या ‘मटका किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमनाथ सोपान शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व इंदापूर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकून सुनील लाला गायकवाड (वय ४८, रा. यशवंतनगर, इंदापूर) याला ताब्यात घेतले.चौकशीत तो सोमनाथ शिंदे याच्यासाठी मटका खेळवत असल्याची कबुली दिल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी २,४९० रुपयांची रोख रक्कम, मटक्याचे आकडे लिहिलेली स्लिपबुक आणि बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल इंदापूर मध्ये नगरपालिकेच्या एका व्यापारी गाळ्याचे स्लॅब कोसळले होते. त्या गाळ्यामध्ये अवैधपणे मटका जुगार सुरू होता.मात्र, तो जुगार कोण चालवत होते. सोमनाथ शिंदे की अजून कोण..?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!