Uncategorizedराजकीय

INDAPUR Harnaval guruji/हरणावळ गुरुजींची पदवीधर निवडणुकीत विकेट पडणार की मतांचा चौकार मारणार?

राजकीय भूमिका बदलल्याची चर्चा; पदवीधर मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष!

इंदापूर,दि १४

  • इंदापूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर छाप पाडणारे हरणावळ गुरुजी आता पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या काळातील त्यांच्या राजकीय भूमिका आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता, इंदापूर तालुक्यातील पदवीधर मतदार त्यांना किती प्रतिसाद देणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात हरणावळ गुरुजी कधी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या व्यासपीठावर, तर कधी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या व्यासपीठावर भाषण करताना दिसल्याचे सांगितले जाते. प्रवीण माने यांनी निवडणूक लढवावी, त्यातून इंदापूर तालुक्यात परिवर्तन घडू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडल्याची चर्चा होती.

मात्र, निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी दत्तात्रय भरणे यांना साथ दिल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले.त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या काळातही हरणावळ गुरुजी भाजपकडून इच्छुक असल्याची चर्चा होती. मात्र, त्या ठिकाणी त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली; परंतु ऐनवेळी माघार घेतल्याचेही सांगितले जाते.

आता पदवीधर विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी पुन्हा एकदा नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रभावित करणारे हरणावळ गुरुजी यावेळी पदवीधर मतदारांना कितपत आकर्षित करू शकतात, हा खरा प्रश्न आहे.नेत्यांच्या व्यासपीठावर भाषण करणे आणि प्रत्यक्ष मतपेटीतून जनतेचा कौल मिळवणे, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हरणावळ गुरुजींच्या राजकीय वक्तृत्वाची खरी कसोटी आता पदवीधर मतदारांच्या मतदानातून लागणार आहे.

इंदापूर तालुक्यातील सुजाण पदवीधर मतदार त्यांना पसंती देणार की अन्य उमेदवारांच्या पारड्यात आपले मत टाकणार? हरणावळ गुरुजी इंदापूरमधून किती मते मिळवणार? त्यांच्या उमेदवारीचा प्रत्यक्ष मतांवर किती परिणाम होणार? या प्रश्नांची उत्तरे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होतील.आता पाहायचे एवढेच हरणावळ गुरुजींची राजकीय खेळी यशस्वी ठरणार की पदवीधर मतदारांच्या कौलातून त्यांची विकेट पडणार?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!