विशेष

पैलवान महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक.!!

पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ.

पुणे,दि.१

  • आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकांदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस तपासतून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांनी बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडवकवले जात आहे असे त्यांनी म्हटले आहे. सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी २०२३ मध्ये माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सिकंदर शेख हा चर्चेत आला होता. सिकंदरच्या अटकेनंतर राज्याच्या कुस्ती क्षेत्रात खळबळ माजली असून याप्रकरणी लवकरच अधिक माहिती समोर येईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!