सामाजिक

माजी नगरसेवक पोपट शिंदे यांनी कोविडमध्ये लावलेल्या लहान वृक्षाचा झाला वट वृक्ष.

इंदापूर,दि.१७

  • इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक पोपट शिंदे यांनी कोरोनाच्या महामारीमध्ये इंदापूर शहरातील टेंभुर्णी नाक्या नजीक असलेल्या मशानभूमीमध्ये लहान वृक्षांची लागवड केली होती. त्या लहान वृक्षांचे वटवृक्षामध्ये रूपांतर झाले असून या वटवृक्षाच्या सावलीला अनेक वाटसरु विसावा घेत आहेत.

गेल्या तीन-चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. त्यावेळी वृक्षांचे महत्त्व सर्वांना कळाले होते. अनेकांना कमी ऑक्सिजनमुळे आपला जीव गमवावा लागला होता. ऑक्सिजन हा माणसाच्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचा असतो याचे महत्त्व त्यावेळी प्रत्येक माणसांना कळाले होते.

त्या वेळी इंदापूर शहरात इंदापूर नगरपालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवक पोपट शिंदे यांनी टेंभुर्णी नाक्या नजीक असलेल्या मशानभूमीमध्ये लहान वृक्षांची लागवड केली होती. त्या लहान वृक्षांचे संगोपन रमेश (आबा) शिंदे, प्रशांत शिंदे, सोमा लोंढे, गोपाळ राऊत, जतीन पटेल, संदीप देवकर व संदीप दौंड यांनी केले. त्यांनी लावलेला एकाही वृक्षाला पाण्याअभावी जळू दिले नाही. त्याची योग्य काळजी घेतल्याने त्या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षामध्ये झाले असून या वृक्षांच्या सावलीला अनेक जण विसावा घेताना दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!