विशेष

ईदगाह परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज ठेवण्याचे नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा यांचे नगरपालिका प्रशासनाला आदेश.

इंदापूर,दि १८

  • इंदापूर शहरात रमजानच्या पवित्र महिन्याच्या पार्श्वभूमीवर ईदगाह परिसरात स्वच्छता व व्यवस्थापनाची काटेकोर तयारी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने इंदापूरचे नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा यांनी प्रत्यक्ष भेट देत परिसराची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान त्यांनी मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक त्या सूचना दिल्या. विशेषतः स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा याबाबत कोणतीही त्रुटी राहू नये, यावर त्यांनी भर दिला.

रमजान महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविक ईदगाह परिसरात येत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.नागरिकांच्या व मुस्लिम बांधवांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

“रमजान हा अत्यंत पवित्र महिना असून मुस्लिम बांधवांच्या भावना लक्षात घेऊन स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्रशासनाने पूर्ण तयारीत राहून नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये.”

 भरत(शेठ)शहा,(नगराध्यक्ष- इंदापूर, नगरपालिका)

दरम्यान, प्रशासनाच्या या सक्रिय भूमिकेमुळे रमजान निमित्त ईदगाह परिसरात येणाऱ्या मुस्लिम बांधवांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळणार  आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!