विशेष

Big news Pune rural/ बदली झाली, आदेश निघाला; तरी हवालदार भिगवणमध्येच! नेमके गौडबंगाल काय?

इंदापूर, दि. ५ 

  • पोलीस दलात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आदेश निघतात, बदल्या होतात आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असते. मात्र, भिगवण पोलीस ठाण्यात बदली आदेशाची अंमलबजावणी नेमकी होतेय तरी का? असा सवाल उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सचिन अशोक पवार यांची बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बदली आदेश होऊनही संबंधित हवालदार अद्याप भिगवण पोलीस ठाण्यातच कार्यरत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, बदली झालेल्या कर्मचाऱ्याला संबंधित पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्याची प्रक्रिया अपेक्षित असताना, सचिन पवार यांना भिगवण पोलीस ठाण्यातून अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे आता प्रश्न केवळ एका पोलीस हवालदाराच्या बदलीचा राहिलेला नसून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोणाच्या पातळीवर अडली आहे? हा मुख्य प्रश्न बनला आहे.

बदलीचा आदेश निघूनही कर्मचारी त्याच ठिकाणी कार्यरत राहत असेल, तर आदेशाची अंमलबजावणी न करण्यामागे नेमके कारण काय? संबंधित कर्मचाऱ्याला कार्यमुक्त न करण्याचा निर्णय कोणी घेतला? आणि वरिष्ठांच्या आदेशापेक्षा स्थानिक पातळीवरील निर्णय अधिक प्रभावी ठरत आहेत का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.‘आदेश वरिष्ठांचा, पण अंमलबजावणी स्थानिक पातळीवर?’ अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू झाली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन बदली आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे की नाही, याबाबत स्पष्टता देण्याची गरज निर्माण झाली आहे.दरम्यान, या प्रकरणाबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे आणि पोलीस हवालदार सचिन पवार यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यांची बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!