वडापुरी–माळवाडी जिल्हा परिषद गटात दिपक जाधव मजबूत दावेदार.
सर्वपक्षीय पाठिंबा; जनतेत वाढता विश्वास.

इंदापूर,दि.३
- वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची चाहूल लागली असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिपक जाधव यांच्या नावाला जनतेची प्रचंड पसंती मिळत आहे. स्थानिक पातळीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा त्यांना स्पष्ट पाठिंबा असून जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा व्यापक प्रमाणात सुरू आहे.
गावोगावी फिरून जनतेशी थेट संपर्क, विकासासाठी सातत्याने पाठपुरावा आणि समाजकार्याच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत निर्माण केलेली छाप हे त्यांचे सर्वात मोठे बळ मानले जात आहे. अडीअडचणीच्या काळात सामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यात जाधव नेहमी पुढे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला गावकऱ्यांमध्ये आपुलकीची व विश्वासाची भावना दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिनिधी मंडळ जाधव यांना उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे जाणार आहे. “दीपक जाधव यांना संधी दिल्यास हा गट राष्ट्रवादीसाठी निश्चित विजयाचा ठरक ठरेल,” असा सूर पक्षांतर्गत तसेच गावपातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उमटताना दिसत आहे. उलट जाधव यांची उमेदवारी न दिल्यास हा गट राष्ट्रवादीसाठी अडचणीचा ठरू शकतो, अशीही मतप्रणाली व्यक्त होत आहे.
लक्ष्मण देवकाते पंचायत समितीसाठी चर्चेत..!!
दरम्यान, माळवाडी पंचायत समिती गटात लक्ष्मण देवकाते हे नाव आघाडीवर दिसत आहे. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून लढवून दोन बलाढ्य पक्षांना टक्कर देत उल्लेखनीय मते मिळवत त्यांनी आपली ताकद सिद्ध केली होती. युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी असून स्थानिक स्तरावर त्यांचे मजबूत नेटवर्क असल्याचे पक्षकार्यकर्ते सांगतात.
स्थानिक ग्रामीण भागातील प्रश्न, विकासाचा वेग, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणारा दृष्टिकोन यामुळे देवकाते यांच्याबाबत जनतेत सकारात्मक वातावरण आहे.
स्थानिक राजकीय वर्तुळात ‘दीपक जाधव जिल्हा परिषद व लक्ष्मण देवकाते पंचायत समिती’ अशी जोडी उभी राहिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन्ही स्तरांवर स्पष्ट फायदा होणार असल्याचे चित्र आहे. ही जोडी टिकली तर वडापुरी–माळवाडी गटात राष्ट्रवादीचा विजय अधिक निश्चित होईल.
आगामी काळात पक्षाचा निर्णय व उमेदवार जाहीर होण्याची सर्वांच्या नजरा लागल्या असताना या गटाची निवडणूक राजकीयदृष्ट्या रंगतदार होणार हे निश्चित!



