विशेष

क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त इंदापूर नगरपालिकेत अभिवादन.

इंदापूर,दि ११

  • क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर नगरपालिकेच्या वतीने अत्यंत श्रद्धापूर्वक अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला नगराध्यक्ष भरत शेठ शहा, उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी एकत्रितपणे त्यांच्या कार्याला अभिवादन करत समाजातील शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून दिली.

क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांमुळे आजही समाजाला दिशा मिळत असून त्यांच्या कार्याचा आदर्श घेणे ही काळाची गरज आहे.

  • नगराध्यक्ष भरत (शेठ) शहा.

या कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याला वंदन करत समाजसेवेचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!