गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या “स्वामिनी’ चा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा.
टेंभुर्णी मधील गोविंद वृद्धाश्रमातील वृद्धांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप.

इंदापूर,दि.९
- इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सचिन खुडे यांची दोन वर्षाची कन्या स्वामिनी हिचा वाढदिवस टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात साजरा करत वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना खाद्यपदार्थांसह विविध दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे हे कायम सामाजिक बांधिलकी जपत समाज उपयोगी विविध उपक्रम राबवत असतात. त्याचाच प्रत्येक पुन्हा एकदा आला आहे कारण घरातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. त्याचा अनुषंगाने सचिन खुडे यांच्या दोन वर्षाच्या कन्येचा म्हणजे स्वामिनी हिचा वाढदिवस टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात साजरा करत वृद्धाश्रमातील वृद्धांना दैनंदिन वापरातील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले की सामाजिक जीवनात वावरत असताना अनेक कुटुंब आवश्यकतेपेक्षा अधिकचा खर्च करत कुटुंबातील व्यक्तींसोबतच वाढदिवस साजरा करतात. यावेळी त्यांचा मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होतो. मात्र आमचे खुडे कुटुंब कायम कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवस समाजातील गोरगरीब, वंचित व वयोवृद्धांसोबत साजरा करतात. वाढदिवसाच्या अनावश्यक खर्च टाळून समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात.
माझी कन्या स्वामिनी हिचा वाढदिवस समाजाचे एक देणे लागतो म्हणून टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींना दैनंदिन वापरातील जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून साजरा केला. या वाढदिवसामुळे आम्हाला गरजू लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधी चे आम्ही खुडे कुटुंबाने सोनं केलं याचा आम्हाला प्रचंड आनंद झाला असून या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व कुटुंब अतिशय आनंदी आहोत.
सचिन खुडे (गटविकास अधिकारी- इंदापूर)