उजनीच्या पाणी साठ्यात झपाट्याने घट.
सद्यस्थितीला उजनीत ४८.३१ टि .एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक.

इंदापूर,दि.६
- पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा जलसाठा निम्म्यावर आला आहे. जसजशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत, तशी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची गरज वाढू लागली आहे. सद्यस्थितीला उजनीत ४८.३१ (टि.एम.सी) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
उजनी वरती असलेल्या उपसा सिंचन योजना,उन्हाळी आवर्तन व पिण्याच्या पाण्यासाठी कालव्याच्या व भीमानदीपात्रातून भरमसाठ पाणी सोडण्यात येत आहे .परिणामी, उजनी धरण्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. त्यामुळे उजनी जलाशयातील पाण्याचे तातडीने व काटेकोरपणे नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
दरम्यान, दरवर्षी उन्हाळ्यात उजनीच्या पाण्यासाठी शेतकरी टाहो फोडतात, परंतु यश येत नाही. या सर्व गोष्टींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात त्यामुळे या परिस्थितीला जबाबदार असलेली कालवा सल्लागार समिती नेमके करते काय? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच मागील वर्षे पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे जिरायती भागासह बागायती क्षेत्रातील शेतकरी सुखावला होता.
परंतु गेल्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसणारा शेतकरीवर्ग सध्यातरी समाधानी आहे.मात्र जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उजनी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाणीसाठा पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. जर अशीच परिस्थिती राहिली तर ऐन उन्हाळ्यात उजनीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची चिंता उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना वाटत आहे.
उजनी धरणाच्या दैनंदिन मापदंडांचा सारांश, ६ मार्च २०२५..
मुख्य आकडेवारी
१) पाण्याची पातळी- ४९४.२२० मीटर (आर डब्ल्यू एल)
२) पाण्याचा पसरण क्षेत्र- २६६.७३ चौरस किलोमीटर
३) विशाल साठा- २५३५.८२ दशलक्ष घनमीटर (८९.५४ टीएमसी)
४) जिवंत साठा- ७३३.०१ दशलक्ष घनमीटर (२६.८८ टीएमसी)
५) जिवंत साठा टक्केवारी- ४८.३१%
प्रवाह आणि बहिर्वाह
१. प्रवाह : पावसाचे प्रमाण : ० मिमी (आज) / ५८३ मिमी (एकूण)
२. बहिर्वाह : बाष्पीकरण: ५.६० मिमी / ०.९० दशलक्ष घनमीटर