विशेष
INDAPUR OFFER/इंदापूरमध्ये मोंगिनीसच्या शॉपीबाहेर खवय्यांची गर्दी! अर्धा किलो केक फक्त १०० रुपयांत.

इंदापूर,दि २५
- प्रसिद्ध मोंगिनीस (Monginis) केक ब्रँडची नवीन शॉपी इंदापूरमध्ये सुरू झाली असून, आज ग्राहकांसाठी ठेवण्यात आलेल्या विशेष ऑफरला खवय्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अर्धा किलो केक अवघ्या १०० रुपयांत मिळत असल्याने आज सकाळपासूनच या शॉपीसमोर ग्राहकांनी गर्दी केली आहे.
केक खरेदी करण्यासाठी नागरिकांनी शॉपीसमोर एकच रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक ग्राहकाला १०० रुपयांत अर्धा किलो केक दिला जात असल्याने केकप्रेमींमध्ये या ऑफरची चांगलीच चर्चा सुरू आहे.
देशभरात मोठे आउटलेट नेटवर्क असलेल्या मोंगिनीस ब्रँडची शॉपी आता इंदापूरमध्ये सुरू झाल्याने स्थानिक ग्राहकांना केक आणि बेकरी उत्पादनांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
इंदापूरमध्ये केकसाठी रांग, अन् अर्धा किलो केक फक्त १०० रुपयांत! या खास ऑफरमुळे नवीन शॉपीच्या परिसरात आज सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.



