विशेष

Ujjni sand mafia/दिवसा तहसीलदारांचा दणका, रात्री उजनीत वाळू माफियांचा धुमाकूळ!

उजनीत नेमकं चाललंय काय?

इंदापूर,दि १२

  • उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दिवसा वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी लपवून ठेवल्या जातात, तर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे. उजनीतील या प्रकारामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

एकीकडे इंदापूरचे तहसीलदार अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने कारवाई करताना दिसत आहेत. मात्र, या कारवायांनंतरही रात्रीच्या वेळी वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर येत असल्याने या अवैध व्यवसायाला आळा बसणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.

इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे हे अवैध वाळू उपशाविरोधात कठोर कारवाई करत असताना दिसत आहेत. मात्र, उजनीत रात्रीच्या अंधारात वाळू उपसा सुरू असल्याच्या चर्चेमुळे या प्रकाराला आळा बसणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. दिवसा कारवाई आणि रात्री वाळू उपसा, हा प्रकार खरोखर सुरू असून त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण मिळवण्याचे आव्हान आहे. शासनाचा महसूल आणि उजनीची नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी रात्रीच्या अवैध वाळू उपशावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे!

दिवसा बोटी लपवायच्या आणि रात्री पुन्हा वाळू उपसा सुरू करायचा,असा प्रकार सुरू असल्यास संबंधित यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. केवळ दिवसा कारवाई करून चालणार नाही, तर रात्रीच्या वेळीही प्रभावी गस्त,संशयित ठिकाणांवर लक्ष आणि अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आणि नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी महसूल विभाग सह संबंधित प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी संयुक्तपणे ठोस पावले उचलणार का? अवैध वाळू उपशाला पूर्णविराम कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!