Pune’s local crime/ घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीस अटक; ४ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत.
स्थानिक गुन्हे शाखा विभागाची दमदार कामगिरी.

बारामती,दि १४
- घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेले सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, महिला आरोपी जयपाल लखन पवार (वय ४१, रा. निरावागज फाटा, ता. बारामती, जि. पुणे) हिने बारामती परिसरातील एका वसाहतीतून घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सदर महिला बारामती परिसरातून सातारा येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
आरोपीकडून सुमारे ४ तोळे सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.
या कारवाईत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती तालुका पोलिसांच्या पथकाने सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पो.स.ई सुधीर वाळुंज, बालासाहेब कांरडे तसेच,पो.अमलदार शिवाजी निकम, सचिन होळकर, स्वप्नील आहिवळे, पोपट नाळे, किशोर तेलंग, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, गणेश ढेरे आणि रहिस मुलाणी यांच्यासह पोलीस पथकाने सहभाग घेतला.



