राजकीय

Discussion of ‘Fix MLA 2029/इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘फिक्स आमदार २०२९’ बॅनरची चर्चा!

इंदापूर,दि २१

  • इंदापूर तालुक्यात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकांमध्ये एका बॅनरने मात्र संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवकन्या निशाताई शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लावलेल्या भव्य बॅनरवर ‘फिक्स आमदार २०२९’ असा ठळक उल्लेख केला आहे. त्यामुळे या बॅनरची इंदापूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बॅनरवर हर्षवर्धन पाटील यांचे छायाचित्र आणि शुभेच्छांचा मजकूर असून, ‘फिक्स आमदार २०२९’ या एका वाक्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिवकन्या निशाताई शिंदे या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या या बॅनरमुळे इंदापूरमध्ये ‘२०२९ चा राजकीय संदेश आत्ताच?’ अशी चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी लावलेल्या या फलकाने केवळ शुभेच्छा न देता आगामी राजकारणाची दिशा सूचित केली आहे का, याबाबतही इंदापूर तालुक्यात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!