इंदापूर मधील प्रभाग ३ मधून सौरभ शिंदे यांची जोरदार चर्चा.
तरुणाईचा उत्साह, पक्षाचा विश्वास आणि जनतेचा अभिमान.

इंदापूर,दि १
- इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रभाग क्रमांक ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून सौरभ लक्ष्मण शिंदे हे प्रबळ इच्छुक म्हणून चर्चेत आहेत. शांत, संयमी, नम्र आणि कार्यतत्पर स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतो.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे खंदे समर्थक म्हणून सौरभ शिंदे पक्षसंघटन, समाजकार्य आणि जनसंपर्क या क्षेत्रात सतत सक्रिय आहेत. पक्षनिष्ठा आणि विकासाभिमुख दृष्टीकोनामुळे पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
महाविद्यालयीन काळापासूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणाऱ्या सौरभ शिंदे यांनी कोरोनाकाळात समाजासाठी मदतीचा हात पुढे केला. पोलिस, पत्रकार आणि आरोग्यसेवकांना मास्क व साहित्याचे वितरण, मुस्लिम बांधवांसाठी शीरखुर्मा किट वाटप, तसेच इफ्तार पार्टीचे आयोजन करून धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवले. मुलीच्या जन्माचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करून त्यांनी समाजात सकारात्मक संदेश दिला.
महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ आणि ‘गरबा-दांडिया’ सारखे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी महिलांना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, सण-उत्सवांमध्ये सहभाग, दिवाळी फराळ आणि मिठाई वाटप यांद्वारे त्यांनी समाजाशी नाते घट्ट केले. कोणतेही पद नसतानाही त्यांच्या पुढाकारातून प्रभागात अनेक विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ शिंदे यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे प्रभाग क्रमांक ३ मध्ये जनतेत उत्स्फूर्त प्रतिसाद उमटत आहे.
प्रामाणिक, लोकाभिमुख आणि विकासासाठी तत्पर असा तरुण चेहरा म्हणून सौरभ शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत तरुणाईचा आवाज, जनतेचा विश्वास आणि पक्षाचा अभिमान म्हणून सौरभ शिंदे यांचे नेतृत्व इंदापूरच्या नव्या वाटचालीस नवी दिशा देईल, असा नागरिकांचा ठाम विश्वास आहे.



