Uncategorized

भरत(शेठ)शहा मित्र परिवाराच्या वतीने इंदापुरात दहीहंडी महोत्सवाचे आयोजन…!!

सिने सृष्टीतील सेलिब्रिटी लावणार हजेरी!

  • इंदापूर,दि.१६
    इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने दहीहंडी महोत्सव याहीवर्षी आयोजित करण्यात आला असून हजारो गोविंदाच्या उपस्थितीत इंदापूर पोलीस स्टेशन समोर जुनी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात सोमवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.

यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पुणे जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इंदापूर शहरात दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकाची संख्या अधिक आहे. पुणे- सोलापूर व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी इंदापूरच्या दहीहंडी संघाची कामगिरी नेत्रदीपक असते. या गोविंदा संघातील गोविंदांचा खऱ्या अर्थाने आपल्या शहरात इंदापूरकरांच्या समोर त्यांचा सन्मान व्हावा नवी पिढी, जुनी पिढी अशी ऋणानुबंधाची नाळ अधिक घट्ट व्हावी हाच उद्देश समोर ठेवून भरतशेठ शहा व मित्र परिवाराच्यावतीने हा दहीहंडी महोत्सव ठेवण्यात येतो.

इंदापूर शहरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम पुरुषांसाठी होत असतात. परंतु महिलांसाठी, शालेय विदयार्थ्यांसाठी भरतशेठ शहा मित्र परिवार दहीहंडी कार्यक्रम आयोजित करतो. यामध्ये महिलांसाठी खास स्वातंत्र बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. दहीहंडी फोडणाऱ्या दहीहंडी संघास हजारो रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येते. तसेच सहभागी गोविंदा पथकास योग्य ते बक्षीस व मानचिन्ह देण्यात येते.

यावेळी भरतशेठ शहा मित्र परिवारांच्या वतीने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता सांभेराव या प्रसिद्ध कलाकारांचा विनोदांचा बहारदार कार्यक्रम प्रेषक वर्गांसाठी आयोजित केला असून, प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी यांचा बहारदार नृत्यविष्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. इंदापूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी महिला भगिनींनी, या महोत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी भरतशेठ शहा मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!