सामाजिक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस पुणे जिल्ह्यात सामाजिक व शेतकरी हिताचे उपक्रम राबवून साजरा.

पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती.

इंदापूर,दि.२४

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवश दि.२२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम व शेतकरी हिताचे उपक्रम राबवून संपुर्ण पुणे जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शालोपयोगी वस्तूंचे वाटप, शैक्षणीक साहित्य वाटप, पावसाळी छत्र्या वाटप, आदिवासी आश्रम शाळांना शैक्षणीक साहित्य वाटप, मोफत आरोग्य शिबीर, जिल्हा परिषद शाळांना वह्या व खाऊ वाटप, नोकरी महोत्सव, भजनी मंडळाला साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ५०% सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप व मिल्कींग मशीन वाटप, आरोग्य तपासणी शिबीरात कॅन्सर तपासणी, जेष्ठ महिला होम मिनीस्टर ‍खेळ पैठणीचाचे आयोजन, देशी गाईंसाठी चारा वाटप, महिला सक्षमीकरण्र मेळावा, शासन आपल्या दारी उपक्रम, युवा संकल्प शिबीर, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून विविध विकासकामांचे उद्घाटन, वृक्षदिंडी व वृक्षारोपन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!