इंदापूर येथे फातिमा शेख अभ्यासिकेची सुरवात..!!
इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन.

इंदापूर,दि.७
- इंदापूर शहरातील दर्गाह मस्जिद चौक येथे, किबला अत्तावला शाह बाबा शॉपिंग सेंटरच्या वरच्या मजल्यावर, इंदापूर शहर टिपू सुलतान यंग सर्कल संचलित फातिमा शेख अभ्यासिकेचा, शुभारंभ शुक्रवारी ( दि. 6 ) रोजी, इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या अध्यक्षतेखाली, दर्गाह मस्जिद अध्यक्ष असदखान जमादार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अरविंद ( तात्या ) कार्यक्रम च्या अध्यक्ष स्थानी होते. यावेळी ॲड आशुतोष भोसले शकीलभाई सय्यद , पि एस आय पाडुळे , पै बबलूभाई पठाण,अजिंक्य जावीर,अय्याज तय्यब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक म्हणून, अनिस डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे, व्यवस्थापक अविनाश निकाळजे उपस्थित होते. अभ्यासिका शुभारंभसाठी दर्गाह मस्जिदचे इमाम, मौलाना अब्दुल करीम मुशाहिदी, जकीरभाई काझी, शकीलभाई सय्यद, अबुलभाई पठाण, हाजी नवाजभाई बागवान, जब्बारभाई मोमीन, विधीज्ञ इनायातअली काझी,आझाद पटेल,आरशादभाई सय्यद, आरिफभाई पठाण शकीलभाई बागवान, समभाई सय्यद इब्राहिमबाबा शेख विधीज्ञ आशुतोष भोसले, नगरसेवक जावेद शेख, माजी नगरसेवक लियाकत पठाण मुस्लिम चॅरीटेबल ट्रस्टचे मुख्तार मुलाणी, अजिंक्य जावीर, अमजद मोमीन, डॉ रियाज पठाण मोमीन,ॲड असिफ बागवान,हमीदभाई अतार, जमीनलभाई मोमीन,कदीर बेपारी,प्रशांत उंबरे, सिकंदरभाई बागवान, गणेश पवार, शकीलभाई बागवान, नासिर शेख, अमजदभाई बागवान उपस्थित होते.
टिपू सुलतान यंग सर्कल प्रत्येक समाज कार्यात सहभागी असतो. टिपू सुलतान यंग सर्कल यांनी २०१६ मध्ये टिपू सुलतान यंग सर्कल तर्फे रुग्णवहीका इंदापूरकरांसाठी दिली होती.
इंदापूरचे सुपुत्र, नूतन पोलीस उपनिरीक्षक गोविंद अर्जुन पाडुळे यांचा सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल वतीने करण्यात आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष बंटी सोनवणे यांनी पुस्तक संच भेट दिला. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर भाषण आशुतोष भोसले यांनी केले तर टिपू सुलतान यंग सर्कलचे अध्यक्ष फिरोजखान पठाण यांनी आभार मानले.



