एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्ज भरण्याची व शासनमान्य कागदपत्र पडताळणी सुविधा केंद्र उपलब्ध.
प्रथम वर्ष बी. फार्मसीची व थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२५-२६ सुरू.

इंदापूर, दि.९
- वनगळी. ता.इंदापुर, जि.पुणे येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम वर्ष बी. फार्मसी पदवीच्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. ७ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.१४ जुलै २०२५ पर्यंत चालणार आहे, अशी माहिती एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रदिप बोडके यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी.
प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा.F.C. समन्वयक प्रा.प्रविण आवटे ७७०९११२५२१, प्रा.अमोल रासकर ७७०९३१५८२१, श्री.मयुर सोनवणे ७४१०००२२३८



