सामाजिक
आज भरत (शेठ) शहा मित्रपरिवार यांच्यावतीने दहीहंडी उत्सवाच्या आयोजन
अभिनेत्री मानसी नाईक प्रमुख आकर्षण.
इंदापूर,दि.२९
- आज इंदापूर मध्ये भरत(शेठ) शहा मित्रपरिवाराच्या यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती पोलीस स्टेशन समोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी याही प्रमाणे गोंविदा रे गोपाळा…”अरे बोल बजरंग बली की जय…’असे सूर कानावर पडत इंदापूर शहरातील दहीहंडीतील संघ या उत्साहात सहभागी होणार आहेत. गोपाळ नित्यनेमाने गेल्या महिना दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतायत.उंच उंच मनोरे लावण्यासाठी एकमेकांच्या साथीने तरुणाई अथक प्रयत्न घेत आहे.
यावेळी सिने अभिनेत्री मानसी नाईक उपस्थित राहणार असून शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.