भरत शेठ यांच्या झंझावातापुढे विरोधक हातबल.

इंदापूर,दि.३०
- इंदापूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भरत शेठ शहा यांच्या नावाभोवती प्रचंड उत्साहाचे वलय तयार झाले आहे. शहरातील प्रभागा-प्रभागातून भरत शहा यांच्या समर्थनार्थ उठणारे जयघोष, जनतेत उमटणारा विश्वास आणि त्यांच्या व्यवस्थापकीय व सामाजिक कार्याची ठसठशीत छाप यामुळे विरोधक अक्षरशः हातबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांत झालेल्या पदयात्रा, सभांमध्ये आणि घरगुती बैठकींतून भरत शहा यांच्यावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा नेता, भ्रष्टाचाराचा डागही नसलेले स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व आणि कोणत्याही संकटात सर्वप्रथम धावून जाणारे नेतृत्व अशी ओळख त्यांची पक्की झाली आहे.
इंदापूरमध्ये सर्वसामान्य मतदारांपासून तरुण पिढीपर्यंत सर्व स्तरांतून भरत शहा यांच्या नावाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. “यावेळी नेतृत्व कोणाचं?” असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच— भरत शहा!
निवडणुकीत चांगले भविष्य, विकासाची गती आणि सर्वसमावेशक प्रगती या आशा-अपेक्षांमुळे ‘भरत शेठ यांच्या बाजूने सुफ्त लाट उसळतेय’ अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होते आहे. शहरातील छोटे व्यापारी, शेतकरी, महिलावर्ग आणि युवा वर्ग यांच्यातून मिळणारा उत्स्फूर्त पाठिंबा हेच त्यांच्या लोकप्रियतेचे अधोरेखित प्रतीक ठरत आहे.
सध्या निवडणुकीची प्रक्रिया वेगात सुरू असून शहरात राजकीय वातावरण तापलेले दिसते. मात्र या सर्व गदारोळात भरत शहा यांचे शांत, संयमी, स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व मतदारांना अधिक भावते आहे.जनतेच्या सुख-दुःखात सामील— ‘गोरगरिबांचा खरा सहकारी’संकटाच्या काळात मदतीचा हात देणारे, कोणतीही जबाबदारी टाळून न जाता नेहमी जनतेसोबत उभे राहणारे आणि सामाजिक कामांमध्ये कधीही हात आखडता न घेणारे भरत शेठ शहा— इंदापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे हे नाव आज प्रत्येक घराघरात चर्चेचा विषय बनले आहे.
हाच विश्वास, हाच पाठिंबा आणि हाच विकासाचा नवा अध्याय— यावरच इंदापूरची आगामी निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.



