शैक्षणिक
‘शहा ग्लोबल’च्या चिमुकल्यांमध्ये अवतरले शिवराय.

इंदापूर/प्रतिनिधी –
- येथील शहा ग्लोबल स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुरुवातीला मालती शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली शहा, संस्थेचे विश्वस्त मुकुंद शहा, शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अंगद शहा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्यांनतर चिमुकल्यांनी शिवजयंतीचा पाळणा म्हणत शिवजन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर स्वराज्य शपथ सोहळा, चिमुकल्यांनी शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी मनोगते, महाराजांविषयी गीते सादर केली. समारोप शिवगर्जनेने जल्लोषात करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका खटावकर यांनी केले. या उपक्रमात स्कूलमधील सर्व शिक्षिका, पालक, कर्मचारी यांनी सहभाग घेतला.