देश-विदेश

बकऱ्याच्या नावाखाली कुत्र्याच्या मटणाची विक्री.?

२७०० किलो मांस जप्त.

मुंबई,दि.२९

  • कर्नाटकातील बंगलुरु पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. शुक्रवारी कुत्र्याचे मांस विकल्याच्या संशयावरुन बंगलुरुत तीन ‘एफआयआर’ दाखल झाले आहेत. पहिला एफआयआर कुत्र्याचे मांस बकरीच्या मांस मिसळून त्याची वाहतूक केल्याची होती.दुसरा एफआयआर अन्न गुणवत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याबद्दल गोरक्षक पुनीत केरेहल्ली यांच्या विरोधात होती.

तिसरा एफआयआर पुनीत आणि त्याच्या चार साथीदारांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे एकत्र जमाविल्याबद्दल असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

कुत्र्यांच्या मांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरुन शुक्रवारी बंगळुरु येथे गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी जयपूरवरुन ९० सिलबंद बॉक्समध्ये २७०० किलोचे मांस आणल्याने जप्तीची कारवाई केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकांवर घेराव घालून गोंधळ घातला आहे. हे कुत्र्याचे मांस असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीसांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली. शुक्रवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याचे मांस बकरीच्या मटणात मिक्स करुन ते विक्री केल्याचा संशय नागरिकांना आहे. त्यामुळे बंगळुरु येथील मांसाहारी आणि प्राणी मित्र संघटना या दोघांमध्ये संशयाचे वातावरण आहे.

हे मांस गुजरात आणि राजस्थानातून आले

हे मांस काही कुत्र्याचेा नसून खास प्रकारच्या बकरीचे आहे. ज्याला शिरोही असे म्हणतात. ही जात राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ आणि भूज येथे आढळते. या बकऱ्यांची शेपटी कुत्र्‍यांप्रमाणे थोडी वाकडी असते आणि त्यावर टिपके असतात. त्यामुळे लोक सहज फसतात. त्यांना हे कुत्र्‍याचे शेपूट वाटते. जप्त केलेल्या नमून्यात कोणताही कुत्र्याच्या मांसाचे तुकडे आढळले नाहीत. बकऱ्याचे शॉर्टेज असल्याने काही व्यापारी हे इतर राज्यातून वाजवी दरात हे मटण मागवितात असे कमिशनर ऑफ फूड सेफ्टी के.श्रीनिवास यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!