राजकीय

वडापूरी-माळवाडी जिल्हा परिषद गटात इतिहास घडवल्याशिवाय गप्प बसणार नाही; श्रीनिवास सातपुते यांचा निर्धार !”

इंदापूर,दि ६

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील वडापूरी-माळवाडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे युवा नेते श्रीनिवास सातपुते यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येणाऱ्या काही दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असतानाच सातपुते यांनी कार्यकर्त्यांसह प्रचाराची तयारी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना श्रीनिवास सातपुते म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता असून, पक्ष माझ्या उमेदवारीबाबत सकारात्मक विचार करेल याचा मला विश्वास आहे. जर पक्षाने संधी दिली, तर वडापुरी-माळवाडी जिल्हा परिषद गटात भाजपचा झेंडा फडकवून इतिहास घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी भाजप कायम कटिबद्ध असून यंदा जिल्हा परिषदेवरही भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होईल. कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता असून सातपुते यांच्या प्रचाराच्या हालचालींना वेग आला आहे.

वडापूरी-माळवाडी जिल्हा परिषद गट हा तालुक्यातील महत्त्वाचा गट मानला जातो. त्यामुळे या गटातून भाजपकडून श्रीनिवास सातपुते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!