महाराष्ट्र

राज्यात सर्वत्र पाऊस बरसला ; मात्र,पुण्यावर रुसला.

पुणे,दि.२१ 

  • राज्याच्या अनेक भागामध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यभरात अतिमुसळधार ते मुसळधार सरी बरसत असताना पुण्यासह, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात मात्र पावसाने लपंडाव सुरू केला असून रिमझिम पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यात हवेचा वेग कमी असून कमी दाबाचे पट्टे तयार होण्यास वेळ लागत असल्याने असे चित्र आहे.

गेल्या पाच दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट माथा, विदर्भ या भागात गेल्या काही दिवसांपासून २०० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस सुरू आहे. मात्र पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात मात्र रिमझिम पाऊस सुरू आहे. पुणे (Pune) शहरातील धरणसाठी २० जुलैपर्यंत ४५ टक्के इतकाच आहे. धरण्यात पाणी वेगाने येण्यासाठी पुणेकरांसह जिल्ह्यात मोठ्या पावसाची गरज आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणाचा पाणीसाठी काही प्रमाणात वाढल्याने पाणीकपातीचं संकट टळलं आहे.

तर आज (रविवारी) सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं असून पुण्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!