वा रे! गावपुढारी, स्टंटबाजी करण्यासाठी चक्क उपमुख्यमंत्र्यांचाच शब्द धुडकावत बॅनर बाजी..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुश करून भाजली जातेय स्वतःची आर्थिक पोळी.?
बारामती,दि.२१ (भारत तुपे )
- बारामती शहरासह तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये राजकीय पोळी भाजण्याच्या हेतूने उपमुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी बलाढ्य व वर्चस्ववादी पुढाऱ्यांकडून शहरासह तालुक्यातून गावागावात बॅनर्स उभे करून विद्रूपीकरण होतानाचे चित्र दिसत आहे
दरम्यान या विद्रूपकरणाविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार यांनी वेळोवेळी तालुक्यासह महत्त्वाच्या गावांमधील अधिकाऱ्यांना बॅनर्स लागू नये यासाठी सूचना केल्या आहेत असे असताना देखील चक्क उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दालाच न जुमानता या राजकीय व वर्चस्वादी पुढाऱ्यांकडून मी किती मोठा हे दाखवण्यासाठी गावागावात बॅनर लावून स्टंटबाजी होत आहे.
यावर बारामती तालुक्यातील नगरपरिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी बॅनर बंदीचे ठरावही पास केले. त्याविषयीच्या प्रसिद्धीपत्रकही काढण्यात आली परंतु या स्टंटगिरी/ चमकोगिरी करणाऱ्या पुढार्यांकडून या शासकीय परिपत्रकांना केराची टोपली दाखवण्यात आली व राजरोसपणे अधिकारी,पोलीस प्रशासन यांना न जुमानता वरदळीच्या ठिकाणी मोठमोठे बॅनर उभे करण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे
दरम्यान या चौका चौकात उभे करण्यात आलेल्या बॅनर्समुळे जर कोणा सामान्य नागरिकाच्या जीविकास धोका निर्माण झाला व बॅनरच्या आडून न दिसणाऱ्या गाड्यांमुळे अपघात घडला व यामध्ये कोणा सामान्य माणसाला जीव गमवावा लागला तर यावर प्रशासनाकडून अधिकाऱ्यांवर की बॅनर्स लावणाऱ्या चकोगिरी करणाऱ्या पुढार्यांवर कारवाई होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
दरम्यान या चमकोगिरी करणाऱ्या गाव पुढार्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री आवर घालणार का? व ठिकठिकाणी लागलेले बॅनर निघणार का? हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही या लागणाऱ्या बॅनर्स प्रकारामध्ये लक्ष घालून चमकोगिरी स्टंटबाजी करणाऱ्या गावपुढार्यांना सूचना कराव्यात तसेच वाढदिवसापूर्वीच लावण्यात आलेले ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढण्यासाठी सूचना कराव्यात असे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे.
त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडून आलेल्या सूचनांवर राज्याचे उपमुख्यमंत्री कितपत लक्ष घालणार हे देखील पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
माळेगाव नगरपंचायत मध्ये विनापरवाना जर कोणी बॅनर्स उभारणी केलेली असेल त्याचबरोबर परवाना धारकांनी बॅनर्स उभे करताना कोणी नियमांचे उल्लंघन करून मुख्य चौकांमध्ये जुने बस स्थानक, राजहंस चौक अशा ठिकाणी बॅनर्स उभे केले असतील तर अशा गाव पुढार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर संबंधितांवर शहर शहर विद्रुपीकरण अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील
श्री बालाजी लोंढे
मुख्याधिकारी माळेगाव नगरपंचायत